हरोलीत ‘स्वाइन’ने तरुणाचा मृत्यू
By admin | Published: March 28, 2015 12:25 AM2015-03-28T00:25:36+5:302015-03-28T00:27:08+5:30
सांगली सिव्हील रुग्णालयात मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
जयसिंगपूर : हरोली (ता. शिरोळ) येथील प्रमोद भगवान बन्ने (वय ३१) यांचा ‘स्वाइन फ्लू’ने गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला. काही दिवसांपासून कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ताप व सर्दी आल्याने त्यांना पहिल्यांदा जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, हे निष्पन्न झाले, त्यामुळे त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. शिरोळ तालुक्यातील स्वाइन फ्लूचा हा दुसरा बळी ठरला. (प्रतिनिधी)