डेंग्यू तापाच्या बैठकीत वाद, गोंधळ, चकमक

By admin | Published: May 8, 2016 12:49 AM2016-05-08T00:49:53+5:302016-05-08T00:49:53+5:30

इचलकरंजी पालिकेतील प्रकार : नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यात संघर्ष

Debate, dilemma, flint in Dengue Tapa meeting | डेंग्यू तापाच्या बैठकीत वाद, गोंधळ, चकमक

डेंग्यू तापाच्या बैठकीत वाद, गोंधळ, चकमक

Next

इचलकरंजी : शहरामध्ये डेंग्यू तापाचे रुग्ण आढळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मृतांच्या नातेवाइकांना अर्थसहाय्य आणि प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचा उपचार खर्च देण्याच्या मागणीवरून शनिवारी नगरसेवक संजय तेलनाडे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
पालिकेच्या सभागृहात चालू असलेल्या या बैठकीत त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यातच नगरसेवक अब्राहम आवळे यांनी लालनगर परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करून नगराध्यक्षांच्या टेबलवर कचरा टाकून संताप व्यक्त केला. यावेळी काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र, ज्येष्ठ नगरसेवकांनी हस्तक्षेप करून चर्चेने यावर उपाययोजना करण्याचे ठरविले.
नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू तापावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याविषयीची बैठक झाली. बैठकीसाठी उपनगराध्यक्ष महावीर जैन, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती भक्ती बोंगार्डे, नागरी आरोग्य अभियानाचे प्रभारी डॉ. पवन म्हेत्रे, आयजीएम रुग्णालयाचे डॉ. गौरीप्रसाद वेताळ, अधिकारी उपस्थित होते. आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी परिस्थितीची माहिती दिली. मलेरिया प्रतिबंधक योजनेचे अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून डेंग्यू रोगाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये उपनगराध्यक्ष जैन, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक शशांक बावचकर, रवी रजपुते, आदींनी शहराच्या विविध परिसरातील अस्वच्छतेबाबत प्रशासनाला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले.
डेंग्यू तापामुळे मृत झालेल्या नातेवाईकांना आणि औषधोपचार घेतलेल्या रुग्णांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी बहुतांशी नगरसेवकांनी केली. त्यावर नगराध्यक्ष बिरंजे यांनी या विषयाबाबत नगरपालिका सभेमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक काही शंका विचारत असताना नगरसेवक तेलनाडे यांनी काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी आर्थिक विषय मंजूर करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे सांगितले. यावरून नगरसेवक तेलनाडे व पोतदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मात्र, ज्येष्ठ नगरसेवकांनी वाद संपुष्टात आणला. (प्रतिनिधी)

Web Title: Debate, dilemma, flint in Dengue Tapa meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.