कुरुंदवाडचे संस्थानकालीन थिएटर पाडण्यावरून वाद

By admin | Published: September 24, 2014 12:36 AM2014-09-24T00:36:21+5:302014-09-24T00:40:10+5:30

शॉपिंग सेंटर, सिनेमागृहाचा प्रस्ताव : मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Debate on the erosion of the institutional theater of Kurundwad | कुरुंदवाडचे संस्थानकालीन थिएटर पाडण्यावरून वाद

कुरुंदवाडचे संस्थानकालीन थिएटर पाडण्यावरून वाद

Next

गणपती कोळी - कुरुंदवाड -नगरपालिकेने येथील संस्थानकालीन भालचंद्र थिएटर पाडून त्या ठिकाणी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचे वाहन पार्किंग, शॉपिंग सेंटर व अद्ययावत सिनेमागृह बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, शहरातील काहींनी संस्थानकालीन इमारती पाडण्याला विरोध करून थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
न्यायालयीन वादातून शहराचा विकास होणार नाही, यासाठी पालिका पदाधिकारी व याचिकाकर्त्यांनी शहराच्या विकासासाठी प्राधान्य देऊन यावर सर्वमान्य तोडगा काढण्याची गरज आहे. येथील संस्थानकालीन भालचंद्र थिएटरचे बांधकाम जुने आहे. तसेच इमारतही उंच आहे. यामुळे या थिएटरमध्ये नैसर्गिकरीत्या गारवा मिळतो. काही शहरवासीय मनशांती, विरंगुळा व करमणूक म्हणून या थिएटरमध्ये येत असतात. शहराची वाढती लोकसंख्या, त्यांना पुरवाव्या लागणाऱ्या गरजा व त्यासाठी पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी नव्या पर्यायांच्या शोधात नगरपालिका आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या थिएटरचे पालिकेला फारसे उत्पन्न मिळत नाही. या मोठ्या शहरात वाहन पार्किंगची व्यवस्थाच नाही. त्यामुळे ही जुनी इमारत पाडून तेथे तळमजल्यावर वाहन पार्किंग, शॉपिंग सेंटर व तिसऱ्या मजल्यावर अद्ययावत साठ आसनी सिनेमागृह बांधण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला नगरपालिकेने मंजुरी दिली आहे.
निवडणुकीच्या अचारसंहितेनेतर या प्रस्तावासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी पदाधिकारी प्रयत्नात असतानाच मुंबई उच्च न्यायालयात कृष्णात लोकरे यांच्यासह चौघांनी या प्रस्तावाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यामुळे याचिकाकर्ते व नगरपालिका पदाधिकाऱ्यांमध्ये तेढ निर्माण झाले आहे.

भालचंद्र थिएटर ही संस्थानकाळातील केवळ वास्तूच आहे. जुनी वास्तू असल्याने पडझड ही चालूच आहे. या जागेचा वापर पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी केल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल. याचिका दाखल करणाऱ्यांना पालिका नेहमी सहकार्य करीत असताना, अशी याचिका दाखल करणे दुर्दैवी आहे.
- संजय खोत,  -नगराध्यक्ष, कुरुंदवाड नगरपरिषद

शहराच्या मध्यभागी १५ गुंठे क्षेत्रावर संस्थानकालीन भालचंद्र मेमोरियल हॉल आहे.
शहरवासीयांच्या करमणुकीसाठी छोट्या पडद्यावरून सिनेमा दाखवितात. याचा ठेका गेल्या ६० वर्षांपासून हुबळी येथील गणेश नाईक कुटुंबाकडे आहे. घरोघरी केबल नेटवर्क व अत्याधुनिक सिनेमागृह यामुळे चित्रपट शौकिनांनी या चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या इमारतीचा  -उत्पन्न म्हणून नगरपालिकेला उपयोग होत नाही.

Web Title: Debate on the erosion of the institutional theater of Kurundwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.