२७ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:10 AM2018-08-20T01:10:33+5:302018-08-20T01:10:36+5:30
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांना लाभ झाला आहेत. त्याचा सातबारा कोरा झाल्याने ते कर्जमुक्त झाले आहेत. त्यांना १२४ कोटी १३ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानासह १ लाख ९६ हजार शेतकºयांना ४१४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे.
शेतीमालाला अपेक्षित भाव नसल्याने पिकांचा उत्पादन खर्च अंगावर, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडले होते. कर्जाच्या बोजाखाली सापडलेल्या राज्यातील शेतकºयांना आर्थिक आरिष्टातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली.
दीड लाखांपर्यंतच्या थकीत शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ आणि दीड लाखांवरील थकबाकीदारांना एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) आणली. केवळ थकबाकीदार शेतकºयांना आधार न देता अनेक अडचणींवर मात करीत प्रत्येक वर्षी कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाºया शेतकºयांना परतफेडीच्या २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान
देण्याची घोषणा केली. शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. याला शेतकºयांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांशी संलग्न साडेचार लाख शेतकरी खातेदारांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यातील सर्वाधिक २ लाख ५७ हजार शेतकरी हे जिल्हा बॅँकेशी संलग्न होते. या अर्जांची छाननी, बदललेल्या निकषांनुसार झालेली फेरछाननी आणि अंंतिम पात्र शेतकरी करण्याच्या प्रक्रियेस प्रशासनाच्या पातळीवर विलंब झाला. विविध छानन्या, नियमांचा अडथळा शेतकºयांना पार करावा लागला.
वर्षभराच्या प्रक्रियेत आतापर्यंत जिल्ह्णातील १ लाख ९६ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. कर्जमाफीच्या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील २७ हजार ८७२ शेतकºयांचा सातबारा कोरा झाला असून, ते पूर्णपणे कर्जमुक्त झाले आहेत. या शेतकºयांना १२४ कोटी १३ लाखांचा लाभ झाला आहे. यामध्ये दीड लाखापर्यंतच्या २५ हजार ९०२ शेतकºयांना १०२ कोटी १३ लाखांचा लाभ झाला आहे; तर दीड लाखावरील १९७० शेतकºयांना ‘ओटीएस’ योजनेतून २२ कोटींचा लाभ झाला आहे.
७८ हजार शेतकºयांना अद्याप प्रतीक्षा
जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी दाखल झालेले अर्ज आणि आतापर्यंत मिळालेली कर्जमाफी पाहता अद्याप ७८ हजार ८०० शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.
निकषांच्या चाळणीत हे शेतकरी अडकले असून त्यांना पात्र करण्यासाठी निकषांत शिथिलता आणावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.