कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:04 AM2018-06-22T01:04:14+5:302018-06-22T01:04:14+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने कणेरी मठामध्ये आयोजित शेतकरी व बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश, संतोषकुमार महापात्रा यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यातील सुमारे ३७ लाख शेतकºयांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा, अशी शासनाची इच्छा आहे. कर्जमाफीच्या कामी स्टेट बँक आॅफ इंडियासह अन्य सर्वच बँकांनी सक्रिय योगदान देऊन शेतकºयांना सहाय्यभूत होण्यासाठी मदत केली आहे. बँकांनी शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उत्कृष्ट शेतकरी तसेच बचत गटातील महिलांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते केला. स्वागत व प्रास्ताविकात स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश यांनी तसेच शेतकरी सदाशिव चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
समारंभास कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांच्यासह मान्यवर, बँकेचे व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बचत गटासाठी मॉल
महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर लवकरच महिला बचत गटांसाठी मॉल उभारण्याचा संकल्प असून याठिकाणी महिला बचत गटाच्या उत्पादनांना विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील. जिल्ह्यात सात तालुका विक्री केंद्राच्या उभारणीला गती दिली असून २ विक्री केंद्रे पूर्ण झाल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.