महापुरातील कर्जमाफीचे पैसे बॅँकांच्या खात्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:36 AM2020-02-28T01:36:15+5:302020-02-28T01:37:37+5:30
गुरुवारी कोषागार कार्यालयातून संबंधित बॅँकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. हे पैसे समप्रमाणात म्हणजे कर्जाच्या ७१ टक्क्यांप्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै व आॅगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरातील बाधित शेतकºयांचे कर्जमाफीचे पैसे जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांच्या खात्यावर अखेर गुरुवारी वर्ग झाले. पहिल्या टप्प्यात १९५ कोटींची रक्कम आली असून, त्याचे समप्रमाणात वाटप केले जाणार आहे.
पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशासनाने ९२ हजार ७३० शेतकºयांच्या कर्जमाफीची २७५ कोटी ४७ लाख इतक्या रकमेची मागणी सरकारकडे केली होती. पहिल्या टप्प्यात ९० हजार १२६ शेतकºयांसाठी १९५ कोटींची रक्कम आली असून, गुरुवारी कोषागार कार्यालयातून संबंधित बॅँकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. हे पैसे समप्रमाणात म्हणजे कर्जाच्या ७१ टक्क्यांप्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत.
शिरोळसाठी ६३ कोटी
जिल्ह्यात सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला होता. येथील १६ हजार २१८ शेतकऱ्यांना ६३ कोटी ९४ लाख कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातील १५ हजार २११ शेतकऱ्यांना २७ कोटी ८ लाख रुपये मिळाले आहेत.