सरसकट दुकाने बंदबाबत आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:14+5:302021-04-07T04:26:14+5:30
काेल्हापूर : कोल्हापुरातील दुकाने बंद ठेवायची की, व्यवसायाला परवानगी द्यायची याचा निर्णय आज राज्याच्या मुख्य सचिवांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर घेतला ...
काेल्हापूर : कोल्हापुरातील दुकाने बंद ठेवायची की, व्यवसायाला परवानगी द्यायची याचा निर्णय आज राज्याच्या मुख्य सचिवांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांची आज बुधवारी दुपारी बारा वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे.
‘ब्रेक द चेन’अंतर्गत सरसकट दुकाने बंद ठेवण्यास कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी दुपारनंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली असली तरी सर्वाच्या नजरा आजच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील सध्या कोल्हापुरात नाहीत. आज दुपारी बारा वाजता मुख्य सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असून यात जिल्हाधिकारी दौलत देसाई हा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मंत्री पाटील कोल्हापुरात आले तर ते बैठकही घेऊ शकतील. या बैठकीनंतरच व्यवसाय सुरू ठेवायचा की बंद करायचा याचा निर्णय होईल. जो काही निर्णय होईल तो राज्यासाठी लागू असेल. एकट्या कोल्हापूरसाठी वेगळा काही निर्णय होण्याची शक्यता नाही. कारण कोल्हापुरातही रुग्णवाढीचा दर वाढला आहे.
-