ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:45+5:302020-12-08T04:22:45+5:30
गडहिंग्लज : ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय गडहिंग्लज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने झाला. नावीन्यपूर्ण योजनेेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार ...
गडहिंग्लज : ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय गडहिंग्लज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने झाला. नावीन्यपूर्ण योजनेेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यास सभागृहाने आजच्या सभेत सोमवारी (दि. ७) मंजुरी दिली.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा ऑनलाईन झाली. जैव ऊर्जा निर्मिती आणि शववाहिका भाडे निश्चिती याविषयावर विशेष चर्चा झाली. १ कोटी ६८ लाख खर्चाचा जैव ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय झाला.
शहरांतर्गत शववाहिकेची सेवा मोफत आणि शहराबाहेर कमीत-कमी ५०० रुपये व प्रतिकिलोमीटर २५ रुपये यापैकी जास्त असेल ते भाडे आकारण्यास सभागृहाने मंजुरी दिली.
मातृत्ववंदन योजनेंतर्गत गर्भवती महिलेला पहिल्या अपत्यासाठी मिळणाऱ्या पाच हजारांच्या अनुदानासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे गर्भवती महिलेची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी यावेळी दिली.
चर्चेत उपनगराध्यक्ष महेश कोरी, सत्ताधारी आघाडीचे पक्षप्रतोद बसवराज खणगावे, विरोधी पक्षनेते हारूण सय्यद, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर व रेश्मा कांबळे यांनी भाग घेतला.
-----------------------------------------------
* गडहिंग्लज नगरपालिका : ०७१२२०२०-गड-१४