व्हॅक्सिनसाठीचे बूथ वाढविण्याचा निर्णय, दिवसभरामध्ये १०५ जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:14 PM2020-12-25T13:14:58+5:302020-12-25T13:18:59+5:30
Coronavirus Unlock Cpr Hospital Kolhapur- भारत बायोटेकसच्या व्हॅक्सिनसाठी सीपीआर इमारतीत बूथ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रोम हेल्थ अँड टुरिझम प्रा. लि.चे डॉ. धनंजय लाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दिवसभरात १५० जणांची नोंदणी करण्यात आली असून, १०५ जणांना लस टोचण्यात आली आहे.
कोल्हापूर : भारत बायोटेकसच्या व्हॅक्सिनसाठी सीपीआर इमारतीत बूथ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रोम हेल्थ अँड टुरिझम प्रा. लि.चे डॉ. धनंजय लाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान, दिवसभरात १५० जणांची नोंदणी करण्यात आली असून, १०५ जणांना लस टोचण्यात आली आहे.
गेले तीन दिवस कोव्हॅक्सिनची लस देण्याची प्रक्रिया सीपीआरमध्ये सुरू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत १००० स्वयंसेवकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्या दोन दिवशी अपेक्षित लसटोचणी झालेली नाही. त्यामुळे आता बूथ वाढवून संख्या वाढविण्यात येणार आहे.
लस टोचून घेण्यासाठी येणाऱ्यांसोबत एखादी व्यक्ती येत असल्यामुळे या परिसरात आता गर्दी होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात नसल्याने आता सीपीआर इमारतीच्या बाहेर बूथ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना सविस्तर माहिती या बूथवर देण्यात येणार आहे. यानंतरच आता लसीकरणासाठी पाठविले जाणार आहे.