ब्राह्मण उद्योजक संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार, कोल्हापूर येथील नियोजन बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:41 PM2018-09-06T17:41:43+5:302018-09-06T17:44:30+5:30

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने २५ ते २९ आॅक्टोबर २0१८ रोजी पुणे येथे अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजवर ‘ब्राह्मण उद्योजक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये कोल्हापूरमधून उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास उद्योजक नितीन वाडीकर आणि नानासाहेब चितळे यांनी व्यक्त केला.

Decision in planning meeting at Kolhapur, determination to succeed in Brahmin business conclave | ब्राह्मण उद्योजक संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार, कोल्हापूर येथील नियोजन बैठकीत निर्णय

कोल्हापूर येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने उद्योजक संमेलन पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांचा उद्योजक नितीन वाडीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डावीकडून अभय देशपांडे, दिलीप गुणे, शाम जोशी, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देब्राह्मण उद्योजक संमेलन यशस्वी करण्याचा निर्धारकोल्हापूर येथील नियोजन बैठकीत निर्णय

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने २५ ते २९ आॅक्टोबर २0१८ रोजी पुणे येथे अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजवर ‘ब्राह्मण उद्योजक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये कोल्हापूरमधून उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास उद्योजक नितीन वाडीकर आणि नानासाहेब चितळे यांनी व्यक्त केला.

या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापूर येथे उद्योजक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांना इंडियन व्हर्च्यूअल युनिव्हर्सिटी बंगलोर यांनी संघटन आणि सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट मिळाल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे सरचिटणीस सागर कुलकर्णी यांनी पुण्यात पाच दिवस होणाऱ्या या संंमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी चितळे उद्योग समूहाचे नानासाहेब चितळे यांनी मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन वाडीकर, मार्गदर्शक अभय देशपांडे, दिलीप गुणे, घाटगे- पाटील उद्योग समूहाचे मोहन घाटगे, अनिता जनवाडकर, सुप्रिया काळे, केदार तेंडुलकर, अभय तेंडुलकर, गणेश अभ्यंकर, सुरेश गुळवणी, डॉ. उदय कुलकर्णी, सतीश कुलकर्णी यांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी गोविंद कुलकर्णी यांनी सर्व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय महासचिव शामराव जोशी यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्र्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. आदित्य मैंदरगीकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी श्रीपाद मराठे, अ‍ॅड. चंद्रशेखर कुलकर्णी, केदार पारगावकर, श्रीधर कुलकर्णी, उदय महेकर, सुधीर सरदेसाई, दिलीप कुलकर्णी, अ‍ॅड. सुघोष खांडेकर, अ‍ॅड. आसावरी कुलकर्णी, अ‍ॅड. जमदग्नी कुरुंदवाड, मयुर तांबे, हरिष कुलकर्णी जयसिंगपूर, किरण कुलकर्णी, प्रियांका कुलकर्णी, सुनील सामंत, निखिल इनामदार, प्रदीप अष्टेकर, सतीश सांगरूळकर, स्वानंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Decision in planning meeting at Kolhapur, determination to succeed in Brahmin business conclave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.