उद्योगांना १० टक्के ऑक्सिजन देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:53+5:302021-06-05T04:18:53+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी उपलब्ध ऑक्सिजन साठ्यापैकी १० टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरण्याची परवानगी शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. त्यानुसार ...

Decision to provide 10% oxygen to industries | उद्योगांना १० टक्के ऑक्सिजन देण्याचा निर्णय

उद्योगांना १० टक्के ऑक्सिजन देण्याचा निर्णय

Next

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी उपलब्ध ऑक्सिजन साठ्यापैकी १० टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरण्याची परवानगी शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. त्यानुसार उद्योजकांना जवळपास ६ टन ऑक्सिजनचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळाला आहे. मात्र, वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यास हा पुरवठा बंद करण्याची अट घालण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या उपचार घेतलेल्या रुग्णांपैकी ३ हजार १४६ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी रोज ५२.२२ टन ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजनचा वापर होऊन एक दिवसांचा साठा शिल्लक राहत आहे. त्यामुळे उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाकड़े औद्योगिक कारणासाठी २० टक्के ऑक्सिजन वापराची परवानगी मागितली होती. त्यानुसार ही परवानगी देण्यात आली. वैद्यकीय कारणासाठीची रोजची ऑक्सिजनची मागणी व पुढील २४ तासांसाठीचा साठा शिल्लक ठेवण्याची व ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही, याची जबाबदारी उत्पादक व रिफिलर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

---

या उद्योगांना परवानगी

-औषध, लस, वैद्यकीय उपकरणे तयार करणारे उद्योग

- अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग

- निर्यात घटक

- निरंतर प्रक्रिया उद्योग

- उद्योगाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची सोय असणारे उद्योग

--

उद्योगांची चाके होणार सुरू...

ऑक्सिजनअभावी गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील उद्योगांची चाके थांबली आहेत. येथील १६० फौंड्री, फॅब्रिकेशन युनिटमधील काम थांबले होते. या निर्णयामुळे उद्योजकांना ५ ते ६ टन ऑक्सिजनचा वापर करता येणार आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळताच उत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: Decision to provide 10% oxygen to industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.