‘शिवस्वराज्य’ दिनाचा निर्णय क्रांतिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:07+5:302021-06-05T04:19:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन यापुढे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावयाचा ग्रामविकास विभागाचा ...

The decision of 'Shivaswarajya' day is revolutionary | ‘शिवस्वराज्य’ दिनाचा निर्णय क्रांतिकारक

‘शिवस्वराज्य’ दिनाचा निर्णय क्रांतिकारक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन यापुढे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावयाचा ग्रामविकास विभागाचा निर्णय ऐतिहासिक व क्रांतिकारक असल्याचे गौरवोद्गार मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काढले.

६ जूनला शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने घेतला आहे. त्याबद्दल सकल मराठा समाज, मराठा स्वराज्य ट्रस्ट, अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा संघटनांच्या वतीने शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांच्या उद्धारासाठी उभी हयात खर्ची घातली, या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पिढ्यानपिढ्या चिरंतन राहील.

वसंतराव मुळीक म्हणाले, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे. हा उत्सव शहरांसह गावागावात आणि घराघरात जाणार आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या या कार्याची नोंद घेऊन कोल्हापुरात हा राज्यस्तरीय सत्कार सोहळा आयोजित करावयाचा होता, परंतु कोरोना महामारीमुळे तो प्रातिनिधिक स्वरूपात करीत आहोत.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनाचा हा ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय ही साधी सोपी गोष्ट नाही, हा निर्णय हसन मुश्रीफ यांच्यासारख्या एका मावळ्याने घ्यावा, ही आम्हा कोल्हापूरकरांसह तमाम महाराष्ट्रवासीयांना अभिमानास्पद बाब आहे.

ॲड. गुलाबराव घोरपडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाबा जाफर, कादर मलबारी, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, शिवाजी वारके, गोपाळ पाटील, अमित अडसूळ, दीपक मुळीक, नितीन दिंडे, अवधूत पाटील, प्रा. मधुकर पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी - शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भैया माने, कादर मलबारी, इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते. (फोटो -०४०६२०२१-कोल-हसन मुश्रीफ) (छाया- नसीर अत्तार)

Web Title: The decision of 'Shivaswarajya' day is revolutionary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.