पेरणोलीत मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:25+5:302021-06-25T04:18:25+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाची स्थिती भविष्यात कायम ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाची स्थिती भविष्यात कायम राहणार असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी ग्रामपंचायतीने दररोज शाळा निर्जंतुकीकरण, विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणी, सुरक्षितता देण्याची हमी दिली. शाळा सुरु करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे मागणी करण्याचे ठरले. पालकांकडून हमीपत्र व तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.
चर्चेत सभापती उदयराज पवार, सरपंच जाधव, उपसरपंच उत्तम देसाई, सदस्य संदीप नावलकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा सावंत, सदस्य उदय कोडक, ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे, शिक्षिका अनुष्का गोवेकर, जयश्री वरेकर, कविता नाईक आदींनी भाग घेतला.
याप्रसंगी उपाध्यक्षा स्वाती कालेकर, ग्रा. पं. सदस्या उज्वला मस्कर, नंदा कांबळे, लक्ष्मी जोशिलकर, प्रियांका जाधव, बाबासाहेब लोखंडे, वीणा रेळेकर, जयश्री सावंत, मुख्याध्यापिका स्नेहा क्षीरसागर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.