‘सुपर न्यूमररी’चा निर्णय लवकर व्हावा, अन्यथा नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:37 AM2020-12-14T04:37:25+5:302020-12-14T04:37:25+5:30

राज्याच्या सीईटी सेलने प्रथम वर्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश ...

The decision of ‘super numerical’ should be made early, otherwise the loss | ‘सुपर न्यूमररी’चा निर्णय लवकर व्हावा, अन्यथा नुकसान

‘सुपर न्यूमररी’चा निर्णय लवकर व्हावा, अन्यथा नुकसान

Next

राज्याच्या सीईटी सेलने प्रथम वर्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही सध्या सुरू आहे. एसईबीसी स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व मराठा संघटना प्रयत्न करीत आहेत. ईडब्ल्यूएसबाबत व्यक्तिगत स्वरुपात उच्च न्यायालयात दाखल प्रकरणामध्ये ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश झाले आहेत. त्याचा आधार घेत पात्र मराठा विद्यार्थ्यांना ईडब्लूएस कोट्यामधून प्रवेश द्यावा यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. यावर्षीच्या ७०:३० प्रादेशिक कोट्याबाबतचे प्रकरणही निर्णायक स्थितीत आहे. या दोन्ही मुद्दयांवर लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. अधिवेशनही आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील एक-एक टप्पा पुढे गेल्यानंतर निर्णय झाल्यास त्याचा फायदा फार विद्यार्थ्यांना होणार नाही. त्यामुळे सुपर न्यूमररी, ईडब्ल्यूएस अथवा अन्य काही पर्यायाचा निर्णय तातडीने घ्यावा. तोपर्यंत उर्वरित प्रवेश प्रक्रिया स्थगित अथवा प्रलंबित करावी. सुपर न्यूमररी, ईडब्ल्यूएस अथवा अन्य काही शासन निर्णय झाल्यानंतरच त्याप्रमाणे सुधारणा करून उर्वरित प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी प्रथम वर्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कोल्हापूरमधील विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आदींना शुक्रवारी ई-मेलद्वारे पाठविले आहे.

चौकट-

प्रवेश प्रक्रिया थोडी लांबली, तरी चालेल

नॅशनल मेडिकल कमिशनने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाचे वर्ग फेब्रुवारीमध्ये भरणार आहेत. त्यामुळे राज्याची प्रवेश प्रक्रिया थोडी लांबली, तरी पुरेसा वेळ असल्याने फारसा फरक पडणार नसल्याचे विद्यार्थी, पालकांचे मत आहे.

Web Title: The decision of ‘super numerical’ should be made early, otherwise the loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.