कोल्हापुरात नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
By विश्वास पाटील | Published: February 20, 2024 06:33 PM2024-02-20T18:33:41+5:302024-02-20T18:39:56+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (बी. एस.स्सी. नर्सिंग महाविद्यालय) ...
कोल्हापूर : कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (बी. एस.स्सी. नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन पॅरावैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. एकूण ७ शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे २०७ कोटी इतका खर्च करण्यात येईल. तसेच; पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष आवर्ती खर्चापोटी सुमारे १७ कोटी इतका निधी देण्यात येईल.
कोल्हापूरसह इतर चार शासकीय परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इत्यादीसाठी अंदाजे १४१ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन खर्चात मान्यता दिली जाणार आहे. तसेच; आवश्यक पदे भरण्यात येतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.