जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : हसन मुश्रीफ

By admin | Published: September 21, 2015 12:30 AM2015-09-21T00:30:52+5:302015-09-21T00:31:08+5:30

तालुक्यातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

Declare drought in the district: Hasan Mushrif | जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : हसन मुश्रीफ

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : हसन मुश्रीफ

Next

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहून शासनाने दुष्काळ जाहीर करावा. १ आॅक्टोबर रोजी बांधकाम मजूर घरेलू कामगार योजनांचे गरीब लाभार्थी यांचा मोर्चा कोल्हापूरमध्ये काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पाहून शासनाला धडकी भरेल, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. या मोर्चात ३५ ते ४० हजार लोक सहभागी होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे होते. या बैठकीत शेतकरी संघात बिनविरोध निवड झाल्याबद्दल युवराज पाटील, तालुका संघाचे नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती विजयादेवी राणे, दिलीप पाटील, प्रवीणसिंह पाटील, भैया माने, देवानंद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले की, शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठीच प्रयत्न केले. तालुक्यातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. स्वागत दूरसंचार निगमचे सदस्य संजय हेगडे यांनी केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की, जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक कागलच्या सहभागाशिवाय होत नाही. हे आमदार मुश्रीफांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचेच यश आहे. शेतकरी संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले आणि त्यांनी शेतकरी संघाची निवडणूकबिनविरोध व्हावी याची जबाबदारी मुश्रीफांवर सोपवली आहे. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले की, कागल तालुक्यात सध्या समझोत्याचे राजकारण सुरू आहे. ही चांगली बाब आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण करणाऱ्यांना थारा नको. आभार तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Declare drought in the district: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.