शिरोळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:35+5:302021-08-15T04:25:35+5:30

जयसिंगपूर : शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासह रोख २५ हजारांची आर्थिक मदत मिळावी. शिरोळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांची ...

Declare wet drought in Shirol taluka | शिरोळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

शिरोळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

Next

जयसिंगपूर : शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासह रोख २५ हजारांची आर्थिक मदत मिळावी. शिरोळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, पूरग्रस्तांची स्थावर जंगम मालमत्ता अबाधित ठेवून प्रत्येकाला २ गुंठा जागा द्यावी व घर बांधकामासाठी दहा लाख रुपयांचे अनुदान द्यावे यांसह सतरा मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त सेवा संस्था यांच्यावतीने शनिवारी भर पावसात शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ येथील शिवाजी चौकात पूरग्रस्त एकत्र आले. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर सभा झाली. शिरोळ तालुक्यात वारंवार येणाऱ्या महापुरामुळे अतोनात नुकसान होत आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल पुनर्वसनाच्या हिताच्या बाजूने झाला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी. शिरोळ तालुक्याला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा. पूरग्रस्तांची सर्व कर्जे माफ करावीत. वीज बिले माफ करावीत. पूरबाधित परिसरात आरोग्यासह कोविड लसीकरणासाठी अग्रक्रम देण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना देण्यात आले.

आंदोलनात समीर पटेल, सलिम पटेल, मनोहर तगारे, आदम मुजावर, यल्लाप्पा नाईक, अनिता माने, बाबासाहेब कुरुंदवाडे यांच्यासह पूरग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

फोटो - १४०८२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - शिरोळ तहसील कार्यालयावर शनिवारी पूरग्रस्त सेवा संस्थेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Declare wet drought in Shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.