सांगलीतील डॉक्टरची मौजे वडगावात आत्महत्या, घातपाताचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 02:15 PM2023-12-15T14:15:24+5:302023-12-15T14:15:42+5:30
मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला
शिरोली : मौजे वडगाव येथे डॉ. संतोष जगन्नाथ टोले (रा. आगरण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली) यांचा मृतदेह झाडाला प्लॅस्टिक दोरी अडकून गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. ही आत्महत्या की घातपात आहे, हे स्पष्ट झाले नव्हते.
कारण, डॉ. टोले हे मौजे वडगावचे नाहीत. ते येथे आले कसे की कोणी मारून आणून टाकले, याविषयी चर्चा सुरू आहे. डॉ. टोले यांचे शरीर जमिनीवर होते. तर डोके हे दोरीला गुंडाळून ठेवले होते. ही घटना घडून काही दिवस झाले असल्याची शक्यता असल्याने मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत अमीर दगडू हुजरे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.