शिवशाही बसेसच्या अपघातात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:36 PM2018-11-21T17:36:14+5:302018-11-21T17:37:12+5:30
एस.टी महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसेस सुरुवातीला अपघाताचे प्रमाण वाढले होते. परंतु गेल्या दोन महिन्यात अपघातांच्या संख्येत घट आली असून, शिवशाही बस प्रवासासाठी अधिक सुरक्षित बनविण्याचा महामंडळाच्या प्रयत्न चांगले यश
कोल्हापूर : एस.टी महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसेस सुरुवातीला अपघाताचे प्रमाण वाढले होते. परंतु गेल्या दोन महिन्यात अपघातांच्या संख्येत घट आली असून, शिवशाही बस प्रवासासाठी अधिक सुरक्षित बनविण्याचा महामंडळाच्या प्रयत्न चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे.
वारंवार शिवशाही बसगाड्यांना होणारे अपघात प्रकारांची गांभीर्याने दखल घेत परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबत अपघांतच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश एस.टी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महामंडळाने समिती नियुक्त करून अपघातांच्या कारणांचे विश्लेषण करून उपाययोजना करण्यास सुरु केले. त्यानुसार पुणे येथील महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत एस.टी महामंडळाच्या चालक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
अपघातमध्ये घट...
गेल्या दोन महिन्यात शिवशाही बसेसच्या अपघातात घट झाली असून एप्रिल ते आॅगस्ट २०१८ दरम्यान दर एक लाख कि.मी मागे स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे अपघाताचे प्रमाण ०. ४१ टक्के होते ते सप्टेंबर २०१८ मध्ये ०.३४ टक्के व आॅक्टोबर मध्ये ०.१८ टक्के पर्यंत घटले आहे. तसेच खाजगी शिवशाही बसचे प्रमाण जे एप्रिल ते आॅगस्ट २०१८ दरम्यान दर एक लाख कि.मी मागे ०.३४ टक्के होते ते सप्टेंबर २०१८ मध्ये ०.२८ टक्के व आॅक्टोबर मध्ये ०.२१ टक्के पर्यंत घटले आहे. विशेष म्हणजे रा.प. महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या अपघाताचे वार्षिक प्रमाण दर एक लाख कि.मी. मागे ०.१८ टक्के इतके अत्यल्प आहे. त्यानुसार सध्या शिवशाही बसचे प्रमाण त्याहीपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ९९८ शिवशाही बसेस असून राज्यातील विविध २७८ मार्गावर दैनंदिन २१३० फेर्या करीत आहेत.
१) बसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण
२) चालकांचे विना अपघात बाबत समुपदेशन
३) वाहनांची दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण
४) घाट, रास्ता व वळणावर तज्ञ मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली वाहन चालविण्याचे प्रशिक्षण.
५) थेट बसेस बनविणाºया कंपनीच्या तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.