बाळंतपणातील मृत्यूच्या प्रमाणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 04:22 PM2017-09-19T16:22:00+5:302017-09-19T16:40:11+5:30
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जून २०१६ ते जून २०१७ या वर्षभरामध्ये ३३ हजार ५३८ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अभियानामुळे जिल्ह्यातील बाळंतपणामध्ये होणाºया मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. २०१४-१५ मध्ये बाळंतपणामध्ये ४० महिलांचा मृत्यू झाला होता. मात्र २०१६/१७ मध्ये हे प्रमाण २१ पर्यंत कमी झाले आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर, दि. १८ : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जून २०१६ ते जून २०१७ या वर्षभरामध्ये ३३ हजार ५३८ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अभियानामुळे जिल्ह्यातील बाळंतपणामध्ये होणाºया मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. २०१४-१५ मध्ये बाळंतपणामध्ये ४० महिलांचा मृत्यू झाला होता. मात्र २०१६/१७ मध्ये हे प्रमाण २१ पर्यंत कमी झाले आहे.
जून २०१६ पासून या योजनेला सुरुवात झाली. गरोदर महिलेला प्रसूतिपूर्व काळात चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २० ग्रामीण आणि उपजिल्हा रूग्णालये आणि महानगरपालिकेचे ११ दवाखाने यामधून ही सेवा दिली जाते.
प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला या गरोदर महिलांना या आरोग्य संस्थांमधून ही सेवा दिली जाते. याआधी या महिलाही सवडीप्रमाणे दवाखान्यात जायच्या आणि अनेकवेळा डॉक्टरही असतील याची खात्री देता येत नसे. परंतू आता तारीख निश्चित करण्यात आल्याने महिलांना आणि डॉक्टरांनाही नियोजन करणे सोपे झाले आहे. यातील अनेक महिलांना खाजगी स्त्रीरोगतज्ज्ञांनी सेवा दिली असून रक्त वाढण्याच्या इंजक्शनपासून संपूर्ण संदर्भ सेवा मिळत असल्याने सुलभ प्रसुतीसाठी ही योजना पूरक ठरत आहे.
या अभियानासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपाध्यक्ष आहेत. जिल्हा शल्य चिकि त्सक डॉ. एल. एस. पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाडकर या सर्वांनी या अभियानाला गती दिली.
योजनेचा उददेश
१ गरोदरपणातील दुसºया व तिसºया तिमाहीतील सर्व गरोदर महिलांना उच्च दर्जाची प्रसुतीपूर्व सेवा देणे, तपासण्या करणे व समुपदेशन करणे.
२ आरोग्य सेवेपासून वंचित गरोदर मातांचा शोध घेउन आरोग्य सेवा देणे
३ जोखमीच्या गरोदर महिलांचा शोध घेतल्याची खात्री करून वेळेत व आवश्यक उपचार करणे
४ खाजगी वैद्यकीय, व्यावसायिक, समाजसेवी संघटना, अशासकीय संस्थांचा सहभाग घेणे
५ गरोदर माता सेवांची व्याप्ती वाढवून मातामृत्यु दर व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
या होतात तपासण्या
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, एचआयव्ही चाचणी, रक्तातील साखरेचे प्रमाण आणि व्हीडीआरएल या तपासण्या यावेळी करण्यात येतात. याशिवाय रक्तवाढीसाठी इंजक्शनही देण्यात येते. तपासणीनंतर आवश्यक ते उपचार केले जातात. जे उपचार स्थानिक पातळीवर शक्य नसतात त्यासाठी उपजिल्हा आणि जिल्हा रूग्णालयांमध्ये संदभर्सेवा दिली जाते
अभियानकाळातील आकडेवारी
महिना तपासलेल्या गरोदर महिला अतिजोखमीच्या महिला
जून २०१६ २८७६ १३४
जुलै २३०५ ७९७
आॅगस्ट २११३ ६९२
सप्टेंबर १३६६ ३०८
आक्टोंबर २११३ ७२०
नोव्हेंबर २३७६ ४३२
डिसेंबर ३०८५ ६३१
जानेवारी २०१७ ३१६२ ७२२
फेब्रुवारी ३०५० ६१२
मार्च ३१२१ ६०७
एप्रिल ३१८४ ५०२
मे ३५५१ ४४५
जून ३७४२ ६०७
एकूण ३३५३८ ६७७१
खाजगी डॉक्टरांचे सहकार्य
या अभियानामध्ये खाजगी स्त्री रोग तजञांनी योगदान द्यावे असे अपेक्षित आहे. यासाठी ४९ डॉक्टरांनी तयारी दर्शवली. प्रत्यक्षात ४० जणांना यासाठी काम करण्याची संधी मिळाली. मात्र आजरा, चंदगड, कागल, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात खाजगी स्त्री रोग डॉक्टरांनी या अभियानाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
राज्यात कोल्हापूर तिसºया क्रमांकावर
या अभियानामध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांनंतर कोल्हापूरचा नंबर लागला आहे. या दोन शहरांनंतर अनेक मोठी शहरे महाराष्ट्रात असताना कोल्हापूरने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे.