ब्लड डोनर कोल्हापूर ॲपचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:44+5:302021-09-06T04:27:44+5:30

कोल्हापूर : आजच्या डिजिटल युगात कोल्हापूर ब्लड डोनर ॲप महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज ...

Dedication of Blood Donor Kolhapur App | ब्लड डोनर कोल्हापूर ॲपचे लोकार्पण

ब्लड डोनर कोल्हापूर ॲपचे लोकार्पण

Next

कोल्हापूर : आजच्या डिजिटल युगात कोल्हापूर ब्लड डोनर ॲप महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज व्यक्त केली. येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, तसेच जिव्हेश्वर फाउंडेशनची निर्मिती असलेल्या ब्लड डोनर कोल्हापूर ॲपच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

एखाद्या रुग्णाला हवा असणारा रक्तगट ऐनवेळी शोधण्यासाठी धावपळ करावी लागू नये या उद्देशाने ब्लड डोनर कोल्हापूर ॲपची निर्मिती केली आहे. यामध्ये अप डाऊनलोड केल्यास रजिस्ट्रेशन होऊन संबंधिताला नोटिफिकेशन मिळेल आणि रक्ताची गरज त्वरित पूर्ण होईल. संबंधित रक्तदात्याला ही सेवा मात्र पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे, असे जिव्हेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष रजत ओसवाल यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, दीपा शिकारपूर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. उदय दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, वारणा वडगावकर, संजय जाधव, महेश ढवळे, श्वेता नोतानी, उत्कर्ष फडणीस, बाळासाहेब कडोलकर, मानसिंग पानसकर, दिलीप पाटील उपस्थित होते.

फोटो क्रमांक - ०५०९२०२१-कोल-ब्लड डोनर ॲप

ओळ - कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर तसेच जिव्हेश्वर फाउंडेशनची निर्मिती असलेल्या ब्लड डोनर कोल्हापूर ॲपच्या लोकार्पण रविवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मानसिंग पानसकर, निलोफर आजरेकर, भरत ओसवल, वारणा वडगांवरकर

Web Title: Dedication of Blood Donor Kolhapur App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.