चंदगड नगरपंचायतीच्या शववाहिकेचे सेवाभाव तत्त्वावर लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:25 AM2021-05-12T04:25:52+5:302021-05-12T04:25:52+5:30

चंदगड नगरपंचायतीला मिळालेल्या शववाहिका आज नागरिकांच्या सेवेत दाखल झाली. कोल्हापूर येथील जीवन मुक्ती संघटनेने सेवाभाव तत्त्वावर ही शववाहिका ...

Dedication of Chandgad Nagar Panchayat's hearse on Sevabhav principle | चंदगड नगरपंचायतीच्या शववाहिकेचे सेवाभाव तत्त्वावर लोकार्पण

चंदगड नगरपंचायतीच्या शववाहिकेचे सेवाभाव तत्त्वावर लोकार्पण

Next

चंदगड नगरपंचायतीला मिळालेल्या शववाहिका आज नागरिकांच्या सेवेत दाखल झाली. कोल्हापूर येथील जीवन मुक्ती संघटनेने सेवाभाव तत्त्वावर ही शववाहिका चालविण्यास घेतली आहे. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी व्हाईट आर्मी संचलित जीवन मुक्ती सेवा संस्था कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष अशोक लक्ष्मण रोकडे यांच्याकडे शववाहिकेची चावी सुपूर्द केली.

उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक अ‍ॅड. विजय कडूकर, सचिन नेसरीकर, अभिजित गुरबे, विरोधी पक्षनेते दिलीप चंदगडकर, आनंद हळदणकर, रोहित वाटगी, झाकीर नाईक, अनिता परीट, अनुसया दाणी, नेत्रदीपा कांबळे, संजय चंदगडकर, श्रीकृष्ण दाणी, कलिम मदार, व्हाईट आर्मी प्रतिनिधी विनायक भाट, कृष्णात भेंडे, गजानन सुतार, कस्तुरी रोकडे, श्रीपाद सामंत, विशाल परब, अजय सातर्डेकर, पांडुरंग माईनकर, किरण येरुडकर, हिना नाईक, संपदा प्रबळकर, स्नेहा हवालदार, श्रेया बांदेकर, सुनील रेगडे, परशुराम बामणे, नगरअभियंता हृषिकेश साबळे, वरिष्ठ लिपीक संतोष कडूकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

--------------------------

चंदगड नगरपंचायतीची ही शववाहिका चंदगड शहरासाठी नि:शुल्क असून चंदगड शहराबाहेर २० किलोमीटर अंतरापर्यंत रुपये ५०० तर २० किलोमीटरच्या पुढील प्रती किलोमीटरला १५ रुपयेप्रमाणे शववाहिका भाडे सेवाभाव तत्त्वावर आकारण्यात येणार आहे.

-------------------------

* फोटो ओळी : चंदगड नगरपंचायतीची शववाहिका सेवाभावतत्त्वावर जीवन मुक्ती संघटनेला चालविण्यासाठी सुपूर्द करताना नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष मुल्ला, चंदगडकर व नगरसेवक आदी उपस्थित होते.

क्रमांक : ११०५२०२१-गड-१२

Web Title: Dedication of Chandgad Nagar Panchayat's hearse on Sevabhav principle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.