गोविंद पानसरे स्मारकाचे जानेवारीमध्ये लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 10:54 AM2020-10-31T10:54:20+5:302020-10-31T10:56:47+5:30
govindpansare, samark, satejpatil, meeting, muncipaltycarportaton, kolhapurnews ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांचे स्मारक दर्जेदार केले जाणार असून यासाठी निधी कमी पडू देणार नाही. जानेवारीमध्ये स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांचे स्मारक दर्जेदार केले जाणार असून यासाठी निधी कमी पडू देणार नाही. जानेवारीमध्ये स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. अजिंक्यतारा येथील कार्यालयात स्मारकाच्या कामाचे सादरीकरण आणि आढावा बैठक झाली. महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थित होती.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पानसरे स्मारकाच्या म्युरल वर्कचे (शिल्प) काम दर्जेदारच झाले पाहिजे. आतापर्यंत १८ लाख खर्च झाला असून पुढील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
सतीशचंद्र कांबळे, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी कामाची माहिती दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधून माहिती घेतली. फायबरमध्ये शिल्प केल्यास २० दिवसांत शक्य असल्याचे पुरेकर यांनी सांगितले होते परंतु त्याऐवजी थोडावेळ लागला तरी चालेल परंतु ब्राँझमध्येच शिल्प करण्याचा निर्णय झाला.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, पानसरे स्मारक समितीचे चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, गिरीष फोंडे, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, मुकंद कदम, शंकर काटाळे, आरती रेडेकर, दिलदार मुजावर उपस्थित होते.
काळजी नको, सहा महिने निवडणूक लागत नाही.
मनपा पदाधिकाऱ्यांमुळेच काम जलद गतीने झाले. त्यांच्या कार्यकालात लोकार्पण व्हावे. १५ नोव्हेंबरला त्यांची मुदत संपत असून त्याअगोदर काम पूर्ण होऊन लोकार्पण व्हावे, असे सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले. यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, काळजी करू नका, पुढील सहा महिने महापालिकेची निवडणूक लागत नाही.
कोल्हापुरामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, सचिन पाटील, संजय मोहिते आदी उपस्थित होते.