आयसोलेशन हॉस्पिटल येथील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:00+5:302021-08-17T04:28:00+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या १०८० क्यु. मी. क्षमतेच्या ऑक्सिजन जनरेटर प्लांटचे लोकार्पण पालकमंत्री ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या १०८० क्यु. मी. क्षमतेच्या ऑक्सिजन जनरेटर प्लांटचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते. हा प्लांट उभा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी प्राप्त झाला होता. यासाठी ८०.२५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तत्काळ ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने अल्पावधीतच हा प्लांट उभा केला आहे. या ऑक्सिजन प्लांटमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार आहे.
या ऑक्सिजन प्लांटला आवश्यक तो वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने कोणतीही फी न आकारता तसेच ट्रान्सफॉर्मरशी निगडीत कामे तत्काळ करुन वीज पुरवठा सुरु करुन दिला आहे. यासाठी अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता नामदेव गांधले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित अस्वले, सहाय्यक अभियंता राजेंद्र खोत यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
लोकार्पण कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, वैदयकीय अधिकारी रमेश जाधव, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता अमित दळवी, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, भूपाल शेटे, माजी गटनेते शारंगधर देशमुख, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक राहुल माने, प्रकाश गवंडी, मधुकर रामाणे, माजी नगरसेविका वृषाली कदम, ललिता बारामते आदी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १६०८२०२१-कोल-केएमसी०२
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेटर प्लांटचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.