जयसिंगपुरात शिवार कोविड सेंटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:25 AM2021-05-13T04:25:09+5:302021-05-13T04:25:09+5:30
जयसिंगपूर : शिवार सामाजिक संस्थेच्यावतीने जयसिंगपूर कॉलेजमध्ये २० ऑक्सिजन बेडसहित ५० बेडचे कोविड सेंटरचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. स्वाभिमानी ...
जयसिंगपूर : शिवार सामाजिक संस्थेच्यावतीने जयसिंगपूर कॉलेजमध्ये २० ऑक्सिजन बेडसहित ५० बेडचे कोविड सेंटरचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजनअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भरत मेडिकल ट्रस्ट व जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथील मुलांच्या वसतिगृहामध्ये ५० बेडचे कोविड सेंटर बुधवारी सुरू करण्यात आले. सर्व सोयीनीयुक्त हे सेंटर असून रुग्णांना अल्पोपहारासह भोजनदेखील मोफत दिले जाणार आहे. लोकवर्गणीने हे सेंटर सुरू करण्यात आले असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, डॉ. पांडुरंग खटावकर, सावकर मादनाईक, बजरंग खामकर, शैलेश आडके, डॉ. श्रीवर्धन पाटील, डॉ. अकलंक चौगुले, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, शैलेश चौगुले, शीतल गतारे, अशोक कोळेकर, शंकर नाळे, सागर मादनाईक, सागर शंभूशेटे उपस्थित होते.
फोटो - १२०५२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे शिवार कोविड सेंटरचे लोकार्पण माजी खासदार राजू शेट्टी व उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.