दलबदलू भूमिकाच महाडिक यांना पराभूत करेल:संजय मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:44 AM2019-01-29T00:44:46+5:302019-01-29T00:44:50+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरकरांना गृहीत धरून सोयीनुसार पक्षाचा वापर करणारी दलबदलू भूमिकाच धनंजय महाडिक यांना पराभूत करेल. आपण करतो ते ...
कोल्हापूर : कोल्हापूरकरांना गृहीत धरून सोयीनुसार पक्षाचा वापर करणारी दलबदलू भूमिकाच धनंजय महाडिक यांना पराभूत करेल.
आपण करतो ते योग्य, ही भूमिका
फार काळ टिकत नाही. त्याला
‘ब्रेक’ लागतोच. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणाऱ्यांचे दिवस भरल्याचा इशारा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
यावेळी प्रा. मंडलिक म्हणाले, गेल्या वेळेला निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्याने अडचणी आल्या, तरीही पावणेसहा लाख मते घेतली. गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघातील पाचशेंहून अधिक गावांचा दौरा पूर्ण केला. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय व विकासाचा वारसा घेऊन जनतेसमोर जात असून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यमान खासदारांनी मतदारसंघात सांगता येईल, असे एकही ठोस काम केलेले नाही. नुसते ‘संसदरत्न’ पुरस्काराचे तुणतुणे वाजवण्यापलीकडे काहीच केले नाही.
संसदेत मांडलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्न मतदारसंघांतील होते, त्यातील किती प्रश्नांची सोडवणूक केली, याचे उत्तर खासदारांनी द्यावे. संसदेच्यावतीने देण्यात येणारा हा पुरस्कार नाही. या ‘संसदरत्न’ पुरस्काराबद्दल वेबसाईटवरून धक्कादायक माहिती पुढे आली. एक एजन्सी प्रश्न विचारणारे, संसदेतील सहभाग याबाबतची माहिती संकलित करते. त्याआधारे हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न विचारणेवगळता इतर निकषांत खासदारांचा शेवटचा क्रमांक आहे, अशा शब्दांत त्यांनी महाडिक यांची खिल्ली उडविली.
निष्ठा कशाबरोबर खातात, हे महाडिक कुटुंबीयांना माहिती आहे का? प्रत्येक वेळी ‘सोयीनुसार राजकारण’ करून निष्ठा वाºयावर सोडण्याचे उद्योग केले; पण ज्या-ज्यावेळी कोल्हापूरच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते त्यावेळेला येथील जनतेने राजकीय अभिलेष व पक्षाची चौकट झुगारून देत भल्या-भल्यांना अस्मान दाखविले. हुकूमशाही वृत्तीला ‘ब्रेक’ लागतोच. आता ती वेळ आली असून, महाडिकांचे दिवस भरल्याचा इशारा प्रा. मंडलिक यांनी दिला.
राष्टÑवादीत जाण्याचा
प्रश्न नव्हता
मध्यंतरी आपण राष्टÑवादीत यावे, अशी कागलमधील कार्यकर्त्यांची भावना होती; पण शिवसेना सोडून आपण कधी दुसरा विचारच केला नाही आणि करणारही नाही, असे प्रा. मंडलिक यांनी स्पष्ट केले.
बास्केट ब्रीजचे काय झाले?
कोल्हापूर शहरासाठी किती निधी
दिला? बास्केट ब्रीजचे काय झाले?
केवळ ‘गोंडस’ घोषणा करायच्या
आणि जनतेची दिशाभूल करण्यात महाडिक कुटुंबीय माहीर आहेत; पण जास्त काळ कोल्हापूरच्या जनतेला फसवता येत नसल्याचे प्रा. मंडलिक यांनी सांगितले.
जिल्ह्यास उपाशी,
मग निधी कुठे दिला?
कागल, करवीरसह मतदारसंघातील सर्वच गावांतून खासदारांनी एक रुपयाही निधी दिला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मग, त्यांनी निधी दिला कुठे? असा सवाल प्रा. मंडलिक यांनी केला.