वृक्षतोड कारवाईतील लाकूड अंत्यसंस्कारासाठी द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:54+5:302021-05-26T04:24:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात कोरोना संसगार्मुळे मृत्युसंख्येत वाढ होत असून, येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकूड टंचाई भासत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात कोरोना संसगार्मुळे मृत्युसंख्येत वाढ होत असून, येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकूड टंचाई भासत आहे. त्यामुळे नगरपालिकेमार्फत विनापरवाना वृक्षतोडबाबत कारवाई झालेल्या व जप्त केलेल्या लाकडांचा साठा तातडीने चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रास द्यावा, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचने नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना दिले.
निवेदनात, चाणक्य अंत्यसंस्कार केंद्रातर्फे सध्या विनामूल्य अंत्यसंस्कार केले जात आहेत. स्मशानभूमीत लाकडाची टंचाई भासू नये, यासाठी तसेच नगराध्यक्षांनी महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ५८ (२) नुसार सदर कामासाठी तातडीने हुकूम द्यावा, असे म्हटले आहे. त्यावर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी त्वरित निर्णय घेणार असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात सौरभ मगदूम, उदयसिंह निंबाळकर, शीतल मगदूम, अभिजित पटवा यांचा समावेश होता.