ओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 02:57 PM2021-07-31T14:57:18+5:302021-07-31T15:09:57+5:30

Gadhinglaj kolhapur: गडहिंग्लज शहरातील आजरा व कडगाव रस्त्यावरील ओढ्यात अतिक्रमणामुळेच ओढ्याचे पाणी नजिकच्या वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे ओढ्यामधील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा मनसेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

Delete river crossings, otherwise agitation | ओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन

ओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन

Next
ठळक मुद्देओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन'मनसे'चा इशारा : गडहिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील आजरा व कडगाव रस्त्यावरील ओढ्यात अतिक्रमणामुळेच ओढ्याचे पाणी नजिकच्या वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे ओढ्यामधील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा मनसेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे,आजरारोडवरील ओढ्याशेजारी एका संस्थेने भिंत उभी केली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

अतिवृष्टी व महापूरामुळे बाळूमामा मंदिर, कोड्ड कॉलनी, अर्बन कॉलनी आणि कडगाव रस्त्यावरील नदाफ कॉलनीत पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांचेही स्थलांतर करावे लागले.
ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे बाहेरुन येणारे आणि शहरातील लोकांचा संपर्क तुटला. पूर ओसरल्यानंतर घाणीचे साम्राज्य पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, विनय पाटील, रवींद्र साबळे, एस.पी.चिकुर्डे, दशरथ देसाई, तानाजी डोंगरे, गजानन हरळीकर, अभिजित नांदवडेकर, आनंदा गवस, गौराबाई ठाकर, सरिता पाथरवट, रिटा वेग, अश्विनी जाधव आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Delete river crossings, otherwise agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.