कोल्हापुरात ९९० पशुपक्ष्यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:06 AM2018-07-02T01:06:42+5:302018-07-02T01:06:46+5:30

Delivering 99 Animals in Kolhapur | कोल्हापुरात ९९० पशुपक्ष्यांना जीवदान

कोल्हापुरात ९९० पशुपक्ष्यांना जीवदान

googlenewsNext

संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नैसर्गिक आणि विविध आपत्तींमध्ये सापडलेल्या लोकांना वाचविण्याबरोबरच ९९० पशुपक्ष्यांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिले आहे. या दलातील अधिकारी, जवानांनी माणुसकीसह भूतदयाही जपली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे शहरात ताराराणी चौक (नियंत्रण कक्ष), लक्ष्मीपुरी (दलाल मार्केट), कसबा बावडा, टिंबर मार्केट, फुलेवाडी, प्रतिभानगर या ठिकाणी स्टेशन आहेत. या दलाकडून एकूण १४० अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत.
शहरासह उपनगरांतील कोणत्याही ठिकाणी नैसर्गिक अथवा आग लागणे, आदी स्वरूपांतील आपत्ती निर्माण झाल्याची वर्दी मिळाल्यास त्या ठिकाणी अग्निशमन दल धाव घेऊन मदतकार्य सुरू करते. आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या या दलाने आपत्तीमध्ये सापडलेल्या केवळ लोकांनाच नव्हे, तर पशुपक्ष्यांना वाचविण्याचे कामही केले आहे. अनेकदा मोठा नळा, खड्डा अथवा अडचणीच्या ठिकाणी सापडलेला हत्ती, गाय, श्वान, माकड, मांजर यांना; तर पतंगासाठी वापरलेल्या जाणाºया मांजा दोºयात, विद्युतवाहिनीमध्ये अडकलेली घार, घुबड, मोर, कोकीळ, कावळा, आदी पक्ष्यांना त्यांनी सुखरूप वाचविले आहे. गेल्या चार वर्षांत या दलाने एकूण ६७० पक्षी, तर ३२० प्राण्यांना जीवदान दिले आहे. या पशुपक्ष्यांना वाचविण्याचे काम करताना त्यांच्याकडून अनेकदा अग्निशमन दलाचे अधिकारी, जवानांना शारीरिक इजा झाली आहे. मात्र, या अधिकारी, जवानांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली नाही. या कामगिरीची दखल घेऊन या अग्निशमन दलाला सन २०१५ मध्ये ‘किर्लोस्कर वसुंधरा गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. पशुपक्ष्यांना जीवदान देण्याची या दलाची कामगिरी आदर्शवत आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
सन पक्षी प्राणी
२०१४ १८५ ७९
२०१५ १५० ८६
२०१६ १७५ ८०
२०१७ १६० ७५

Web Title: Delivering 99 Animals in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.