निवडणुकीसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:19+5:302020-12-30T04:33:19+5:30

ग्रामपंचायत निवडणूक या स्थानिक पातळीवर अत्यंत अटीतटीने लढविल्या जातात. यामध्ये भावकीबरोबरच गृहकलही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. अनेकवेळा एकाच घरातले ...

Demand for cancellation of appointments of local staff for elections | निवडणुकीसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी

निवडणुकीसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी

Next

ग्रामपंचायत निवडणूक या स्थानिक पातळीवर अत्यंत अटीतटीने लढविल्या जातात. यामध्ये भावकीबरोबरच गृहकलही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. अनेकवेळा एकाच घरातले दोन उमेदवार वेगवेळ्या विरोधी आघाडीतून रिंगणात उतरतात. तसेच या निवडणुका प्रभागानुसार होत असल्याने मर्यादित मतदार असतात. त्यामुळे एक-एक मतासाठी टोकाचा संघर्ष निर्माण होतो. याचे परिणाम म्हणून निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.

निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान घेतले जाते. अशा मतांची प्रभागात एक किंवा दोन एवढीच संख्या असते. त्यामुळे मतमोजणी वेळी संबंधित कर्मचाऱ्याने कोणाला मतदान केले हे उमेदवार नियुक्त मतमोजणी प्रतिनिधीला समजण्याची शक्यता असते. तेथील स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याच करू नयेत आणि केल्या असतील तर त्या रद्द कराव्यात, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.

Web Title: Demand for cancellation of appointments of local staff for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.