गौण खनिजावरील रॉयल्टी रद्द करण्याची मागणी
By admin | Published: November 5, 2015 11:40 PM2015-11-05T23:40:52+5:302015-11-05T23:53:41+5:30
रॉयल्टी ही जिल्हाधिकारी कार्यालयात भरून घेण्याची सोय करावी,
कोल्हापूर : गौण खनिजावरील रॉयल्टी रद्द करावी, बारकोड पद्धत बंद करावी, आदी मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा खाण व क्रशरधारक कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, महाराष्ट्र शासनाने एप्रिल २0१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टीमध्ये प्रति ब्रास २00 ऐवजी ४00 रुपये अशी दामदुप्पट वाढ केली आहे. ही अन्यायकारक वाढ कमी करावी याबाबत शासनाकडे दाद मागितली आहे. पुढील निर्णय होईपर्यंत गौण खनिजावरील रॉयल्टी पूर्वीप्रमाणे ब्रास २00 रुपये प्रमाणेच भरून घ्यावी. रॉयल्टी ही जिल्हाधिकारी कार्यालयात भरून घेण्याची सोय करावी, जिल्ह्यातील स्टोनक्रशर व खाणधारकावर संबंधित तालुक्यातील तहसीलदारांनी रॉयल्टीसंदर्भात कारवाई करून क्रशर व खाण सील केलेल्या आहेत. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह सुमारे अडीचशे खाण व क्रशरमालक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचे आश्वासन
दरम्यान, खाण व क्रशर कृती समितीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. त्यांनी खाण व क्रशरधारक कृती समितीला आश्वासन दिले की, रॉयल्टी वाढ, बारकोड पद्धत व इतर प्रश्न लवकरच मार्गी लावू.