‘डेरे करणारे गाव’ ; पश्चिम महाराष्ट्रातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:45 PM2020-02-13T12:45:34+5:302020-02-13T12:50:54+5:30

‘डेरे करणारे गाव’ अशीच या गावाची ओळख आहे. कुंभार समाज याच व्यवसायात जास्त एकवटला आहे. सरासरी एक कुटुंब महिन्याला ३०० डेरे तयार करते. लाल माती विकत आणूनच त्यापासून हे डेरे केले जातात. माती भिजवून तिचा गारा केला जातो. त्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी घोड्याचे शेण व राख मिसळली जाते.

Demand for clay tents of Warunul from three districts | ‘डेरे करणारे गाव’ ; पश्चिम महाराष्ट्रातून मागणी

कोल्हापूर जिल्ह्यातील वारनूळ (ता. पन्हाळा) या गावातील सुमारे ५० हून अधिक कुटुंबे मातीचे डेरे करण्याचे काम करतात. उन्हाळा तोंडावर असल्याने त्यांच्या या कामाला सध्या वेग आला आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देकुंभार बांधवांची कला : हंगामात लाखभर डेऱ्यांची होते विक्री

-रवींद्र पाटील
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील वारनूळच्या डे-यांना पश्चिम महाराष्ट्रातून वाढती मागणी आहे. सध्या हे मातीचे डेरे बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावातील कुंभार बांधवांची सुमारे ५० हून अधिक कु टुंबे हे काम करतात. त्यातून उन्हाळ्यातील सहा महिन्यांत लाखाहून अधिक डेरे हे एकटे गाव तयार करते. पारंपरिक मातीच्या कामाला थोडीशी आधुनिकतेची जोड देत त्यांचा हा व्यवसाय उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनला आहे. कोल्हापूरसह इचलकरंजी, सांगली, तासगाव, मिरज, क-हाड, सातारा या भागांत या गावातील डेरे जातात.

‘डेरे करणारे गाव’ अशीच या गावाची ओळख आहे. कुंभार समाज याच व्यवसायात जास्त एकवटला आहे. सरासरी एक कुटुंब महिन्याला ३०० डेरे तयार करते. लाल माती विकत आणूनच त्यापासून हे डेरे केले जातात. माती भिजवून तिचा गारा केला जातो. त्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी घोड्याचे शेण व राख मिसळली जाते. पायाने चिखलून त्याचे गोळे करून घेतले जातात. ते गोळे विजेवर चालणाºया तीन गिअरच्या कुंभार चाकावर घेऊन त्यापासून हव्या त्या आकारानुसार डेरे केले जातात. नंतर तीन टप्प्यांत वाळतील तसे त्यांना हाताने आकार दिला जातो व त्यांना रंग दिला जातो. शेवटी भट्टीत घालून भाजल्यानंतर हा डेरा विक्रीसाठी तयार होतो.

२० पासून ६० पर्यंत दर
मातीच्या डेºयाचे १५ लिटरपासून ते छोट्या मोग्यापर्यंत पाच प्रकार आहेत. त्यांचा दर किमान २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत आहे. हाच डेरा जेव्हा शहरात विक्रीस येतो, तेव्हा त्याची किंमत किमान ५० पासून ते २०० रुपयांपर्यंत होते. कुंभार बांधव घाम गाळून ते तयार करतो, त्याला जेवढे पैसे मिळत नाहीत. त्याहून जास्त पैसे ते विक्री करणा-या व्यापाºयाला मिळतात.
 

गेल्या अनेक वर्षांपासून डेरे करणे हा आमचा प्रमुख व्यवसाय बनला आहे. काम कष्टाचे आणि नाजूकपणाचेही आहे; परंतु आता दिवसेंदिवस ही कामे करण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही, ही अडचण आहे.
जगन्नाथ नाथा कुंभार वारनूळ, ता. पन्हाळा



 

 

Web Title: Demand for clay tents of Warunul from three districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.