बाचणीतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:10+5:302021-05-18T04:24:10+5:30

१९५२ मध्ये बाचणी (ता. कागल) येथे शेतीसाठी व पिण्यासाठी हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधलेला आहे. त्यामुळे १६ गावांतील लोकांना ...

Demand for compensation from farmers in Bachani | बाचणीतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

बाचणीतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

Next

१९५२ मध्ये बाचणी (ता. कागल) येथे शेतीसाठी व पिण्यासाठी हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधलेला आहे. त्यामुळे १६ गावांतील लोकांना या धरणाचा फायदा होत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये नवीन पुलाचे उद्घाटन झाले आहे; परंतु ते काम अतिशय संथगतीने सुरू आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे आहे; परंतु सहा महिने झाले तरीसुद्धा अद्याप एकही पिलर पूर्ण झालेला नाही. नदीच्या मध्यभागी पिलरचे काम अर्धवट सुरू आहे. ते काम करण्यासाठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकलेला आहे. त्यामुळे पाणी इतरत्र वळवलेले आहे. एकूण २६ दरवाजांपैकी फक्त आठ ते नऊ दरवाज्यांतून पाणी जात आहे. त्यामुळे जुन्या धरणावर बाकीच्या दरवाज्यात पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे बरगे आणि दगड वाहून गेलेले आहेत. नवीन पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे आणि जुन्या धरणाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी बाचणीसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी धरण सोसायटीचे सभापती विलास पाटील, उपसभापती अमर पाडळे, भरत माळवे, ऑडिटर शिवाजी परीट, अनिल जोशी, ॲड. सतीश कुलकर्णी, व्यवस्थापक भाऊसो कांबळे, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Demand for compensation from farmers in Bachani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.