भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:13+5:302021-02-13T04:24:13+5:30

इचलकरंजी : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ताबडतोब नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त ...

Demand for disposal of stray dogs | भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Next

इचलकरंजी : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ताबडतोब नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा नगरपालिकेसह नगराध्यक्षांच्या दालनात भटकी कुत्री आणून सोडू, असा इशारा माणुसकी फाउंडेशनने दिला.

शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मोटारसायकलच्या पाठीमागे लागल्याने अपघात होणे. यंत्रमाग कामगारांच्या मागे लागणे. पहाटे व रात्री फिरायला जाणाऱ्यांनाही या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. यंत्रमाग व्यवसायामुळे शहर २४ तास सुरू असते. त्यात कामगारांना रात्री दोन-तीन वेळा चहा-नाश्ता यासाठी बाहेर जावे लागते. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे कारखान्यातून बाहेर पडणे अवघड बनत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नगरपालिकेने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. याआधी निर्बीजीकरणाची मोहीम राबवली असली तरी नसल्यासारख्याच स्थितीत आहे.

Web Title: Demand for disposal of stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.