कोल्हापूर: मंजूर बील काढण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी; ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य अटकेत

By तानाजी पोवार | Published: September 29, 2022 07:08 PM2022-09-29T19:08:35+5:302022-09-29T19:09:23+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या मंजूर बीलापैकी उर्वरित रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी मागितली लाच

Demand for Rs 30,000 bribe to draw sanctioned bills; Village development officer, village panchayat member from Kurdu arrested | कोल्हापूर: मंजूर बील काढण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी; ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य अटकेत

कोल्हापूर: मंजूर बील काढण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी; ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य अटकेत

Next

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या मंजूर बीलापैकी उर्वरित रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी लाच स्विकारताना कुर्डू (ता. करवीर) चे ग्रामविकास अधिकारी महादेव गणपती डोंगळे (वय ५६, रा. घोटवडे, ता. राधानगरी) व ग्रामपंचायत सदस्य धनाजी मारुती पाटील (वय ४७ रा. कुर्डू) यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, गुरुवारी दुपारी सापळा रचून लाचखोरांना पकडले. दोघांनी एकूण ३० हजाराची लाच घेताना कारवाई केली.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कुर्डू (ता. करवीर) गावात तक्रारदारास २, ९९,४३० रुपये सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम करवीर पंचायत समितीकडून मिळाले, बांधकामही पूर्ण केले. त्यापैकी त्यांना पंचायत समितीकडून २ लाख १० हजार व ग्रामपंचायतकडून ८९,४३७ रुपये मिळणार होते. त्यापैकी पंचायत समितीकडून १ लाख ९७ हजार रुपये तक्रारदारास मिळाले.

उर्वरित ग्रामपंचायतीच्या रकमेसाठी तक्रारदाराने ग्रामविकास अधिकारी डोंगळे यांची भेट घेतली. डोंगळे यांनी, पंचायत समितीकडून पैसे मिळवून दिले व उर्वरित बीलाची रक्कम देण्यासाठी एकूण बिलाच्या दोन टक्के पैशाची मागणी केली. तर ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील याने उर्वरित बील मंजूरीसाठी एकूण बिलाच्या ८ टक्के पैशाची मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शरद पोरे, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने यांनी कारवाई केली.

Web Title: Demand for Rs 30,000 bribe to draw sanctioned bills; Village development officer, village panchayat member from Kurdu arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.