विकास आराखड्याच्या पुढील टप्प्यासाठी निधीची मागणी - अंबाबाई मंदिर : महापालिकेकडून नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:21+5:302020-12-13T04:37:21+5:30
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला भाजप सरकारच्या काळात ८० कोटींच्या निधीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी नऊ कोटी रुपये महापालिकेला ...
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला भाजप सरकारच्या काळात ८० कोटींच्या निधीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी नऊ कोटी रुपये महापालिकेला दीड वर्षांपूर्वीच वर्ग झाले आहेत. मंदिर विकास आराखड्यात दर्शन मंडपला प्राधान्यक्रम होता; मात्र त्याच्या जागेसंबंधी मतमतांतरे आणि अनेक हरकती आल्याने हा निधी सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंगकडे वळविण्यात आला आहे. या कामाचा प्रारंभ मार्च महिन्यात झाला आणि लगेच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. आता जनजीवन पूर्वपदावर आल्याने मागील आठवड्यात महापालिकेने या बहुमजली पार्किंगच्या कामाला सुरुवात केली आहे. बेसमेंट, तळमजला आणि त्यावर दोन मजले अशी ही पार्किंगची इमारत असणार आहे. या कामाचा ठेका व्ही. के. पाटील कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला असून, काम पूर्ण करण्यासाठी दहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. जास्तीत जास्त वर्षभरात येथे बहुमजली पार्किंगची इमारत उभारलेली असेल, अशी अपेक्षा आहे.
---
पुढच्या टप्प्यासाठी दहा कोटींची मागणी
विकास आराखड्यासाठी मंजूर झालेला संपूर्ण ७० कोटींचाच निधी मिळावा अशी मागणी महापालिकेने केली आहे. मात्र, एवढी रक्कम एकाचवेळी मिळणे शक्य नसल्याने व्हिनस कॉर्नर येथील काम सुरू करण्यासाठी दहा कोटींची मागणी केली आहे. हा निधी मिळण्यासाठी राज्य शासनाकडे आता पाठपुरावा करावा लागणार आहे.
---
दर्शन मंडपवर निर्णय नाहीच
मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील मोकळ्या जागेत दर्शन मंडप बांधण्यात येणार होते; मात्र ही एकमेव मोकळी जागा असल्याने येथे नवी इमारत उभारण्यास कोल्हापूरकरांनी विरोध केला आहे. त्यामुळे भवानी मंडप परिसरातील अलंकार हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या महापालिकेच्या जागेत नवा दर्शन मंडप बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
--
फोटो नं १२१२२०२०-कोल-बहुमजली पार्कींग
ओळ : कोल्हापुरातील सरस्वती टॉकीज परिसरात अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत बहुमजली पार्किंग उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---
इंदुमती गणेश
--
अंबाबाईचा फोटो वापरावा
--
इंदुमती गणेश