ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 05:12 PM2022-01-05T17:12:59+5:302022-01-05T17:13:33+5:30

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच ...

Demand of Gram Panchayat employees will be discussed at Ministry level assured says Rural Development Minister Hasan Mushrif | ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

googlenewsNext

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तर, वित्त विभागाशी संबंधित विषयांबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रश्नी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने कोल्हापुरातील बिंदू चौकात राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. काल, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी ग्रामविकास विभाग सकारात्मक निर्णय घेईल, असे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, किमान वेतन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के कर्मचाऱ्यांची पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती, 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांना मेहनताना देणे आदी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Demand of Gram Panchayat employees will be discussed at Ministry level assured says Rural Development Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.