ताम्रपर्णी नदीतील मासे मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 03:26 PM2020-12-21T15:26:38+5:302020-12-21T15:29:33+5:30

pollution, river, kolhapur- ताम्रपर्णी नदीतील पाणी मळीमिश्रित होवून मासे व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंदगड ग्राहक सरंक्षण समितीतर्फे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

Demand for inquiry into fish death in Tamraparni river | ताम्रपर्णी नदीतील मासे मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी

ताम्रपर्णी नदीतील मासे मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देताम्रपर्णी नदीतील मासे मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणीप्रांतग्राहक संरक्षणचे तहसिलदारांना निवेदन

चंदगड :ताम्रपर्णी नदीतील पाणी मळीमिश्रित होवून मासे व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंदगड ग्राहक सरंक्षण समितीतर्फे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

दौलत (अथर्व) कारखान्याच्या धुरांडीतून निघणाºया मसवेपासून (राखेपासून) नागरिकांच्या डोळ्याला परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे या सर्व गंभीर विषयांची चौकशी करून दोषींवर त्वरीत कारवाई करावी.

निवेदनावर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज रावराणे, निलिमा कोदाळकर राजू किरमटे, रायमन फर्नांडिस, राजाराम पाटील, मारूती हदगल, तुकाराम पाटील, बापू मटकर, शशिकांत मातोंडकर आदीच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Demand for inquiry into fish death in Tamraparni river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.