माणगाव येथे कोविड विलगीकरण कक्षाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:34+5:302021-05-27T04:26:34+5:30
: माणगाव (ता. हातकणंगले) येथे माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत कोरोना अँटिजेन रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये दररोज ...
: माणगाव (ता. हातकणंगले) येथे माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत कोरोना अँटिजेन रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये दररोज दोन-तीन रुग्ण कोरोना संसर्गित रुग्ण आढळत आहेत. सध्या गावात २५ रुग्ण संसर्गित असून चार रुग्ण मृत झाले आहेत.
गावात कोरोना संसर्गित रुग्ण वाढत असून रुग्णांना घोडावत संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात येत असून त्याप्रमाणे आयजीएम, डीवाय पाटील रुग्णालय येथेही रुग्ण उपचार घेत आहेत. संसर्गित रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात घेऊन जाण्यास खासगी वाहनधारक अनास्था दाखवीत असून काही रुग्णांना दुचाकीवरूनच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
गतसाली माणगाव ग्रामपंचायतीने संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभा केले होते. याशिवाय रुग्णवाहिकेची व्यवस्थाही केली होती. त्याच धर्तीवर माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संस्थात्मक विलगीकरण कक्षाची उभारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.