पूरग्रस्त पिकांचे व घरांचे पंचनामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:36+5:302021-07-27T04:26:36+5:30
माणगाव : चंदगड तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे व शेतीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याची मागणी चंदगड ...
माणगाव : चंदगड तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे व शेतीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याची मागणी चंदगड तालुका काँग्रेसतर्फे तहसीलदार विनोद रणावरे यांच्याकडे केली आहे.
सततच्या येणाऱ्या पुरामुळे तालुक्यातील जनता दरवर्षी अडचणीत येते. त्यामुळे सर्व गोष्टींचा अभ्यास करून शासन निकष बाजूला ठेवून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाचे प्रामाणिक पंचनामे व्हावेत, त्याचबरोबर शेतीच्या नुकसानभरपाईचे पंचनामे प्रत्यक्ष वहिवाट व हस्तलिखीत सातबारा पीक पाणी नोंदीनुसार होऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर, नगरसेवक अभिजित गुरबे, राजेंद्र परीट, बाबासाहेब देसाई, उदय देसाई, प्रकाश इंगवले, प्रसाद वाडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळी :
चंदगड तालुक्यातील पूरग्रस्त पिकांचे व घरांचे पंचनामे करण्याच्या मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे तहसीलदार विनोद रणावरे यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर, नगरसेवक अभिजित गुरबे, राजेंद्र परीट, बाबासाहेब देसाई, उदय देसाई आदी उपस्थित होते.
क्रमांक : २६०७२०२१-गड-१२