चाकूचा धाक दाखवून हॉटेलमालकाकडे खंडणीची मागणी-मंगळवार पेठेत फाळकूटदादाचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:57 PM2019-04-05T16:57:26+5:302019-04-05T16:58:44+5:30

हॉटेलमालकाच्या पोटाला चाकू लावून फुकटात जेवणाची मागणी करीत दर महिन्याला दहा हजार रुपयांची खंडणी दिली तरच हॉटेल सुरू राहील; अन्यथा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी दिल्याने

Demand for a ransom by a staunch knife in a hotel owner: Mangalwar Peth | चाकूचा धाक दाखवून हॉटेलमालकाकडे खंडणीची मागणी-मंगळवार पेठेत फाळकूटदादाचे कृत्य

चाकूचा धाक दाखवून हॉटेलमालकाकडे खंडणीची मागणी-मंगळवार पेठेत फाळकूटदादाचे कृत्य

Next

कोल्हापूर : हॉटेलमालकाच्या पोटाला चाकू लावून फुकटात जेवणाची मागणी करीत दर महिन्याला दहा हजार रुपयांची खंडणी दिली तरच हॉटेल सुरू राहील; अन्यथा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी दिल्याने फाळकूटदादासह तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ४) रात्री गुन्हा दाखल झाला. संशयित कुणाल किरण गवळी (वय २५, रा. मंगळवार पेठ) व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांचा समावेश आहे.

अधिक माहिती अशी, मंगळवार पेठेतील हॉटेल पंचरत्नचे मालक संतोष शिवाजी भोसले (४१) हे वर्षभरापासून हॉटेल चालवितात. दोन महिन्यांपूर्वी सराईत गुन्हेगार कुणाल गवळी व त्याचे दोघे साथीदार हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले. जेवण झाल्यानंतर ‘आता माझ्याकडे पैसे नाहीत, नंतर देतो,’ असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर २ एप्रिल रोजी कुणाल व त्याचे साथीदार हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले. मालक भोसले यांनी संशयित गवळीला ‘पूर्वीची उधारी अगोदर दे, त्याशिवाय तुला जेवण देणार नाही,’ असे सांगितले. त्याचा राग आल्याने कमरेला अडकवलेला चाकू काढून त्याने तो भोसले यांच्या पोटाला लावला. ‘यापुढे फुकटात जेवण तर द्यायचेच; शिवाय दर महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यायचा; अन्यथा तुझे हॉटेल येथे चालू देणार नाही,’ अशी धमकी देत शिवीगाळ करून ते निघून गेले. भोसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव पुढील तपास करीत आहेत.



 

Web Title: Demand for a ransom by a staunch knife in a hotel owner: Mangalwar Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.