उपसाबंदी शिथील करण्याची मागणी
By admin | Published: May 24, 2016 11:27 PM2016-05-24T23:27:23+5:302016-05-25T00:26:44+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन : चर्चा करुन निर्णय घेवू : सैनी
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर तालुका सैनिक बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. नव्याने सात हजार ‘ब’ वर्ग सभासदांनाही मतदानाचा अधिकार दिल्याने आता माजी सैनिक नसलेले इच्छुक सरसावल्याने यंदाची निवडणूक वेगळी ठरणार आहे.
बँकेची स्थापना अण्णा हजारे यांनी पारनेर तालुक्यातील माजी सैनिकांना बरोबर घेऊन केली होती.मात्र बँकेचा कारभारात, संचालक मंडळात त्यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा त्याकडे लक्ष दिले नाही.दरम्यान आता संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदार यादी प्रसिध्द झाली असून सुमारे साडेनऊ हजार मतदार आहेत. दर निवडणुकीत फक्त माजी सैनिक, सैनिक असणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार होता. यंदा बाळासाहेब कोकाटे, अनिल थोरात, गणेश पोटघन यांनी ‘ ब’ वर्ग सभासदांनाही मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी संघर्ष केल्यानंतर सहकार विभागाने त्यांनाही मतदार होण्याची संधी दिल्याने माजी सैनिक व्यतिरिक्त सात हजार मतदार वाढले आहेत. मागील निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष अर्जुन चौधरी यांनी वर्चस्व मिळवले होते. तर भैरवी ग्रुपचे अध्यक्ष दशरथ बोरूडे, शिवाजी व्यवहारे यांनी चांगलीच लढत दिली होती. एक जूनपर्यंत मतदान यादीवर हरकती नोंदविण्यात येणार असून त्यानंतर सोळा जून रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)