ऑफलाईनच बियाणे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:23+5:302021-06-04T04:19:23+5:30
सध्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून सर्वर डाऊनही होत आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊनमुळे महा-ई-सेवा केंद्र, नेटकॅफे बंद आहेत. त्यामुळे ...
सध्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून सर्वर डाऊनही होत आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊनमुळे महा-ई-सेवा केंद्र, नेटकॅफे बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांची आॅनलाईन मागणी करायचे कोठे? हा प्रश्न आहे.त्यामुळे आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारुन शेतकऱ्यांना बियाणे वाटप करावे. तसेच, यापुढे कर्नाटकच्या धर्तीवर मे महिन्यातच आणि सातबारानुसार बियाणे मिळावे, अशी मागणी भोकरे यांनी केली आहे.
आॅनलाईनची जाचक अट रद्द करून कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत आॅफलाईन पद्धतीने मागणी अर्ज स्वीकारुन या योजनेचा लाभ द्यावा. खतांची टंचाई दाखवून जे विक्रेते चढ्या भावाने खतविक्री करणा-या दुकानदारांवरही भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात यावी, असेही या निवेदनात भोकरे यांनी म्हटले आहे. यावेळी कागल कृषी विभागाचे सहायक अधीक्षक आर. एस. फडतारे, ए. बी. पाटील, व्ही. बी. खोत आदी उपस्थित होते.
लोकमतचे अभिनंदन...
शेतकऱ्यांना बियाणे मिळवण्यासाठी किती यातायात करावी लागत आहे. इतका त्रास सहन करूनही त्याला अत्यंत तुटपुंजा लाभ पदरी पडणार आहे. याबाबत आज ‘लोकमत’ने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबत शेतकऱ्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदन करत कृतज्ञता व्यक्त केली.
कँप्शन
शेतकऱ्यांना आॅफलाईन पद्धतीनेच बियाणे मिळण्याची मागणीचे निवेदन कृषी विभागाला देताना संभाजी भोकरे.