‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:53 AM2019-09-11T10:53:31+5:302019-09-11T10:56:19+5:30

राजाराम लोंढे कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची ...

Demand for 'self-esteem' 90; Preparation 3 seats | ‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर

‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर

Next
ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर‘शिरोळ’चा पेच शेवटपर्यंत राहणार : कोल्हापुरात पाच जागांवर दावा

राजाराम लोंढे

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची मानसिकता संघटनेची दिसते. खरी अडचण शिरोळ मतदारसंघातच आहे. होम पिच असल्याने ही जागा सोडण्यास तयार नाही, तर राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शड्डू ठोकल्याने आघाडीसमोर पेच आहे.

जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू असली, तरी ‘शिरोळ’वरून आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असून, शेवटपर्यंत पेच राहणार हे निश्चित आहे.

शिवसेना-भाजपचा विजयाचा वारू रोखण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लोकसभेनंतर मोर्चेबांधणी केली असली, तरी दोन्हीकडील मातब्बर शिलेदार पक्षातून बाहेर पडल्याने दोघे युतीशी टक्कर देऊ शकत नाहीत; त्यामुळे स्वाभिमानी, शेकाप, जनता दल, रिपाइं या मित्रपक्षांना सोबत घेऊनच युतीशी दोन हात करण्याची तयारी कॉँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. आघाडीत जागा वाटपाचा फारसा तिढा निर्माण होणार नाही, असे वाटत असले, तरी राज्यातील अनेक मतदारसंघ ‘कळी’चे बनले आहेत. त्यातील शिरोळ असून, ‘स्वाभिमानी’चे होमपिच असल्याने या जागेवर त्यांचा अधिकार राहणार आहे.

‘स्वाभिमानी’ने आघाडीकडे ३९ मतदारसंघांची यादी दिली आहे; पण २०१४ ला संघटना १५ जागांवर लढली होती. त्यातील पाच जागा कोल्हापूर जिल्ह्यातील होत्या; त्यामुळे यावेळेलाही जिल्ह्यातील ‘शिरोळ’सह राधानगरी-भुदरगड, चंदगड, शाहूवाडी, हातकणंगले या मतदारसंघांवर दावा केला आहे. चर्चेअंती मागे-पुढे सरकण्याची तयारीही संघटनेची राहील.

राष्ट्रवादीकडे दहापैकी चार, तर कॉँग्रेसकडे चार मतदारसंघांत ताकदीचे उमेदवार आहेत. प्रकाश आवाडे हे कॉँग्रेसमधून बाहेर पडल्याने इचलकरंजी आणि शाहूवाडीत दोन्ही कॉँग्रेसकडे ताकदीचा उमदेवार सध्यातरी दिसत नाही.

‘शेकाप’ने एकही जागा मिळाली नाही, तर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे; त्यामुळे त्यांना ‘शाहूवाडी’ची जागा सोडण्याची शक्यता आहे. ‘स्वाभिमानी’ला ‘शिरोळ’ची जागा द्यावीच लागेल. त्यानंतर कोणाकडे ताकदीचे उमेदवार आहेत, हे पाहूनच निर्णय होतील; पण काही झाले, तरी आघाडी तुटणार नाही, याची खबरदारी घेण्यावर आघाडीच्या नेत्यांवर एकमत झाल्याचे समजते.

राजेंद्र पाटील यांनी २०१४ ला दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती; त्यामुळे पराभवानंतर त्यांनी लगेच तयारी सुरू केल्याने, आता ते मागे हटणार नाहीत, हे निश्चित आहे. त्यांना ‘स्वाभिमानी’तून उभे करावे, असा प्रयत्न राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहे; पण संघटना सावकर मादनाईक यांच्यावर ठाम दिसते.

त्यात पाटील हे साखर कारखानदार असल्याने त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतात, हेही पाहावे लागणार असल्याने सध्यातरी हा प्रयोग संघटनेच्या चौकटी बाहेरचा आहे. पाटील यांनी बंडखोरी केली तर आघाडीच्या दृष्टीने ती मारक ठरणार असल्याने हा गुंता सोडवायचा कसा? या चिंतेत राष्ट्रवादी  व स्वाभिमानीचे नेते आहेत.


जागा वाटपाबाबत आठवड्यात फैसला होईल, आम्ही ३९ जागांची यादी दिली आहे. एकमेकांची ताकद पाहून थोडे मागे-पुढे सरकण्याची तयारी आहे. ‘शिरोळ’तर आमचे होमपिच आहेच; पण त्याबरोबरच ‘राधानगरी’, ‘चंदगड’वरही आमचा दावा असेल.
- प्रा. जालंदर पाटील,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

 

Web Title: Demand for 'self-esteem' 90; Preparation 3 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.