गारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:46 PM2018-06-28T23:46:02+5:302018-06-28T23:46:31+5:30

गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

Demand for shrimp native varieties for the purchase of pebbles | गारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी

गारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी

Next
ठळक मुद्दे दुर्मीळ, पावसाळ्यात येणारी विविध प्रकारची वेलवर्गीय, फळवर्गीय पिके

गारगोटी : गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

अतिशय दुर्मीळ असणारी आणि फक्त पावसाळ्यात येणारी ही विविध प्रकारची वेलवर्गीय आणि फळवर्गीय पिके आहेत. यांची चव संशोधित आणि संकरित वाणापेक्षा अविट असते. यामुळे शेती सेवा केंद्रात मिळणाºया बियाण्यांपेक्षा या वाणांना ग्रामीण भागातील शेतकरी अधिक पसंती देतात. काही जातींची वाण आता नष्ट झाली आहेत. काळाच्या ओघात उरलेल्या वाणांना किती दिवस तग मिळतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलणाºया पिकांच्या पद्धतीने भारतीय जनजीवनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. हरितक्रांती करण्याच्या नावाखाली वारेमाप रासायनिक खतांचा वापर करून जमिनींचे आणि पर्यायाने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जुन्या वाणांकडे भारतीय माणसाला वळावे लागणार आहे. त्यामुळेच या बाजारपेठा टिकणे आवश्यक आहे.
शेतकरी स्त्रियांनी वर्षभर पारंपरिक पद्धतीने काळजीपूर्वक या बियाण्यांची साठवण केलेली असते. बी-बियाणे विक्रीमुळे थोडाफार आर्थिक लाभ होत असल्याने शेतकरी महिला अशी बियाणी राख, गाडगी, यातून साठवून ठेवतात. केवळ दोन ते तीन आठवडा बाजारात खरेदी-विक्री होते. शेती व परसबागेत पेरणीसाठी ही बियाणी वापरली जात असल्याने खरेदीसाठी शेतकरी व परसबाग करणारे लोक ती खरेदी करतात,तर ज्वारी, वर्णा, मसूर,शेंगदाणे खाण्यासाठी लोक खरेदी करतात.

मृग नक्षत्राच्या काळात उपलब्ध
बाजारात वर्षभर कोणत्याही बी-बियाणे दुकानातून न मिळणारी दुर्मीळ बियाणी फक्त मृग नक्षत्राच्या काळात उपलब्ध होत असल्याने सर्वांना या बिवाळ्या (बियाण्यांची) बाजाराची प्रतीक्षा लागलेली असते. यामध्ये प्रामुख्याने बांधावरची ज्वारी, वरणा, जगदाळे, काटे भेंडी, बावची, मोठा भोपळा, कोहळा, मिरची, दिडका, काकडी, पडवळ, चवाळी, घेवडा, देशी शेंगदाणे, तोंदली, वाळकी, तुरा जोंधळा, तूर, हळदीचे, आल्याचे गड्डे, अशी पारंपरिक बियाणी उपलब्ध होतात.
 

भारतीय कृषी संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांची येथे लागवड केली जात आहे; पण जादा उत्पन्न मिळवण्यासाठी सुधारित आणि संकरित बी-बियाणे वापरण्याकडे शेतकरी वळला असल्यामुळे काही बियाणांच्या जाती नष्ट होत आहेत. पावसाळ्यात बांधावर आणि शेतात येणाºया पिकांची चव जिभेवर रेंगाळते. ही बियाणी शासनाने जतन करणे आवश्यक आहे, अन्यथा काळाच्या ओघात ती पडद्याआड होतील.
- सात्तापा पाटील (कृषितज्ज्ञ, म्हसवे, ता. भुदरगड)

Web Title: Demand for shrimp native varieties for the purchase of pebbles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.