चंदगडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 11:59 PM2017-08-11T23:59:44+5:302017-08-11T23:59:44+5:30

Demand for shutting down illegal activities in Chandigarh | चंदगडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

चंदगडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : चंदगड तालुक्यात बिनधास्तपणे मटका, जुगार सुरू आहेत. गोवा व गावठी दारूचा महापूर तालुक्यात सुरू आहे. या अवैध चालणाºया धंद्यावर तुमचाच अंकुश नाही. याचा त्रास मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी पं. स. सदस्या रूपा खांडेकर यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत केली. अध्यक्षस्थानी सभापती जगन्नाथ हुलजी होते.
गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
तालुक्यातील २०२ पैकी १०८ शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. ११ शिक्षक तालुक्यात हजर झाले तर ६२ पदे रिक्त असल्याची माहिती एस. बी. हालबागोळ यांनी दिली. बबनराव देसाई यांनी शिक्षक पदे रिक्त असताना आम्हाला हवी असलेली गुणवत्ता कशी काय मिळणार? यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी केली आहे.
तडशिनहाळ येथील मराठी शाळेत ५ वर्ग व १ शिक्षक अशी स्थिती असल्याने या ठिकाणी तत्काळ शिक्षक द्या, अशी मागणी सदस्य विठाबाई मुरकुटे यांनी केली.
मुरकुटेवाडी येथे दोन महिन्यापासून अपूर्णावस्थेत रस्ता आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे कामही अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचण होत आहे. झाडे-झुडपे वाढली आहेत. बांधकाम विभागाकडून प्रत्येक मिटींगला तोच आढावा दिला जातो व आम्हालाही प्रत्येक मिटींगला हाच विषय मांडावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून ही कामे होत नसतील तर सांगा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो, असे सदस्य मनिषा शिवणगेकर यांनी सांगितले.
पं. स. कृषी विभागाकडील गोदामाचा ताबा असलेला कर्मचारी गेले आठ दिवस गोदामाची चावी घेऊनच रजेवर आहे. सध्या भात, मूग, मका, पिकावर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी पं. स. कडे औषधे नेण्यासाठी फेºया मारत आहेत. मात्र, औषध देणारा कर्मचारीच रजेवर असल्याने शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत सभापती हुलजी यांनी ही बाब जिल्हा कृषी अधिकारी सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली. सूर्यवंशी यांनी त्या कर्मचाºयांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश यावेळी खातेप्रमुखांना दिले. उपसभापती अ‍ॅड. अनंत कांबळे यांनी आभार मानले.
सर्वांना शेततळे द्या
मागेल त्याला शेततळे अशी जाहिरात शासन करीत आहेत. प्रत्यक्षात शेततळे मागायला गेलेल्या शेतकºयांना अनेक अटी सांगितल्या जातात. मग या योजनेमधून अनेक शेतकरी वंचित राहात आहेत.
त्यामुळे या योजनेचे एकतर नाव बदला नाहीतर सर्वांना शेततळे द्या, अशी मागणी यावेळी सभापती जगन्नाथ हुलजी यांनी केली.

Web Title: Demand for shutting down illegal activities in Chandigarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.