‘ऑनलाईन स्टॅम्प’ला मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:31+5:302020-12-23T04:21:31+5:30
प्रतिक्रिया गेल्या शनिवारी मुद्रांक कार्यालये सुरू राहिली. पण, त्यात आधीच्या दिवसातील प्रलंबित दस्तांची नोंदणी करण्यात ...
प्रतिक्रिया
गेल्या शनिवारी मुद्रांक कार्यालये सुरू राहिली. पण, त्यात आधीच्या दिवसातील प्रलंबित दस्तांची नोंदणी करण्यात आली. नवीन दस्त नोंदणी झाली नाही. या शनिवारी त्याची पुनरावृत्ती होऊ नये. पूर्ण क्षमतेने कार्यालये सुरू ठेवून नवीन दस्त नोंदणी करून घ्यावी.
- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर
नव्या वर्षात मुद्रांक शुल्क अर्ध्या टक्क्याने वाढणार आहे. मात्र, दि. ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत तीन टक्के शुल्कातील सवलत मिळविण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईन स्टॅम्पला मागणी वाढली आहे.
-बाबूराव पाटील, स्टॅम्प व्हेंडर
बँकांतील कर्जप्रकरणे, करार करण्यासाठी लागणाऱ्या स्टॅम्पऐवजी मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी लागणाऱ्या स्टॅम्पच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून या स्टॅम्पची मागणी वाढली आहे.
-सुनील देशमुख, स्टॅम्प विक्रेते