लोकशाही दिन सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:53+5:302021-02-05T07:15:53+5:30

कोल्हापूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी दौलत ...

Democracy Day Monday | लोकशाही दिन सोमवारी

लोकशाही दिन सोमवारी

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी शुक्रवारी दिली.

शासन परिपत्रकानुसार यातील तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे; परंतु न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील्स, सेवा-आस्थापनाविषयक बाबी, अंतिम उत्तर दिलेले अथवा देण्यात येणार आहे अशाप्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. याची सर्व नोंद घ्यावी व लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

--

पक्क्या घरासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या व्यक्तींना अद्यापही स्वत:चे पक्के घर उपलब्ध झाले नाही, त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शहरी भागासाठी संबंधित नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी तसेच महापालिका क्षेत्रासाठी आयुक्त यांच्याकडे विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह तत्काळ अर्ज सादर करावेत.

-

Web Title: Democracy Day Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.