व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:25+5:302021-03-01T04:28:25+5:30
मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. ...
मुरगूड : व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यातच मध्यमवर्गीयांची निष्क्रियता व वाढता आत्मकेंद्रीपणा देशास धोकादायक ठरत आहे. त्यासाठी सामाजिक भान ठेवून चळवळी वाढल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने यांनी केले आहे. सुरुपली येथे नवनिर्माण सामाजिक चळवळीच्या वतीने आयोजित परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र एस. आर. बाईत होते. यावेळी भरमसाठ वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे जीण मेटाकुटीला आणल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी कॉ. अशोक चौगले (मुरगूड), भीमराव कांबळे (कुरणी), सर्जेराव अवघडे (चिमगाव) गणेश कांबळे (करड्याळ) मधुकर भोसले (बस्तवडे), दलितमित्र एस. आर. बाईत यांची मनोगते झाली.
या शिबिरास सम्राट सणगर, बांधकाम कामगार नेते राजू आरडे, प्रा. अशोक चौगले, पापा जमादार, दिनकर माने, प्रदीप वर्णे, संजय जिरगे, अनिल हासबे, रघुनाथ आवळेकर, रामदास किल्लेदार, साताप्पा कांबळे (गडहिंग्लज), विक्रम पाटील, कृष्णात कांबळे, प्रकाश गुरव (टिक्केवाडी), रामचंद्र गोते, हनुमान सेवा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव मोरे, माजी उपसरपंच बाळासो खापरे, गणपती सुतार, विलास दिनकर पाटील आदी हजर होते. आभार रमेश पाटील यांनी मानले.
फोटो ओळ -
सुरुपली (ता.कागल) येथे परिवर्तन कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात डॉ. अच्युत माने, व्यासपीठावर दलितमित्र एस. आर. बाईत, सम्राट सनगर.