पोलीस अधिकारी गजेंद्र लोहार यांच्या निलंबनासाठी ‘डेमोक्रेटिक पार्टी’चा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:59+5:302020-12-08T04:20:59+5:30
विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया हे कामानिमित्त बाहेर असल्याने शिष्टमंडळाने कार्यालयात सहायक पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांची भेट घेऊन ...
विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया हे कामानिमित्त बाहेर असल्याने शिष्टमंडळाने कार्यालयात सहायक पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दोन दिवसांत बैठकीचे आश्वासन लोहिया यांनी फोनवरुन शिष्ठमंडळाला दिल्याने आंदोलन स्थगित केले. आंदोलन मोठ्या संख्येने जमा झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निवेदनात म्हंटले की, दि. २९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने इचलकरंजीत जुगारअड्ड्यावर छाप्यात अटक केलेल्या १४ संशयितांना गावभाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले पण तेथील सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी संशयितांना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ करून कोपराने व गुडघ्यावर रांगायला लावले, सलून व्यावसायिकाकडून पोलीस ठाण्यातच संशयितांचे केसाचे मुंडण केले. त्यांची धिंड काढून त्याचे व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावर प्रसार केले.
मानवी हक्काची पायमल्ली करणाऱ्या गजेंद्र लोहार या पोलीस अधिकार्याचा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने निषेध नोंदविला. पार्टीचे राज्य सरचिटणीस संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, सतीश भंडारे, प्रमोद बिरंजे, सांगली जिल्हाध्यक्ष शीतल खरात, शिरोळ तालुका अध्यक्ष प्रदीप लोंढे, प्रसाद रेडेकर, किसन मुसळे, राजेश कांबळे, आदींचा सहभाग होता.
फोटो नं. ०७१२२०२०-कोल-डीआयजी ऑफीस आंदोलन
ओळ : इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गजेेंद्र लोहार यांना सेवेतून निलंबित करावे या मागणीसाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
(तानाजी)